SBI बँकेकडून ग्राहकांना महत्वाचा ‘Alert’ जारी; खातं असल्यास लगेच चेक करा अकाऊंट, कारण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारतीय स्टेट बँकेने (state bank of india) आपल्या ग्राहकांना ट्विट (tweet) करुन एक महत्त्वाचा संदेश जारी केला आहे. यामध्ये बँकेने एसबीआयच्या (SBI) नावे जर तुम्हाला खोटा आणि बनावट ईमेल आला तर त्यास अजिबात उत्तर देऊ नका असं आवाहन ग्राहकांना केलं आहे. एसबीआय बँकेच्या नावावर ग्राहकांना बनावट ईमेल पाठवला जात असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या नावे आलेला मेल खरा आहे की फसवणुकीसाठी आहे याची खात्री नक्की करून घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे.

एसबीआयने ट्विट म्हटलं आहे की, ‘बँक ग्राहकांना विनंती करत आहे की त्यांनी सोशल मीडियावर अलर्ट राहा. कोणत्याही दिशाभूल आणि बनावट मेसेजद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते’ यामुळे ग्राहकांनी कुठल्याही मेसेजवर आपली खासगी माहिती शेअर करण्याआधी तपासणी करा.

अधिकृत सेवांचा वापर करा
बँकेनं ग्राहकांना स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही प्रकारच्या बँकिंग सेवांसाठी अधिकृत पोर्टलचा वापर करा. जर तुम्ही या सूचनेकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. बँकेने ग्राहकांना सतर्क करण्यासाठी आणखी एक संदेश जारी केला आहे. त्यामध्ये जर तुमच्यासोबत फसवणूक झाली तर तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत पोर्टलवर राज्याचे नाव, लॉगिन आयडी, मोबाइल नंबर आणि ओटीपी अशी माहिती देतस तक्रार नोंदवू शकता.

फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांनी अलर्ट करण्यासाठी एक व्हीडिओदेखील शेअर केला आहे. यामध्ये आपली कोणतीही खासगी माहिती ऑनलाइन शेअर करू नका असं आवाहन ग्राहकांना करण्यात आलं आहे. बँकेने यामध्ये सावधान, सुरक्षित आणि आलेला मेसेज खरा की फसवणुकीसाठी आहे याची तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. (sbi alert massage for their customers on online fraud)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment