राज्यातील सिनेमागृह सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आता शाळा, मंदिरे यांच्यानंतर राज्यातील सिनेमेगृह देखील सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. येत्या 22 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व सिनेमागृह सुरू होतील.
त्याचबरोबर नाट्यगृहांबाबतही राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.

चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यानंतर चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे.

दरम्यान, यापूर्वी राज्यातील शाळा आणि मंदिरे सुरू करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला होता. शाळा 4 ऑक्टोबर पासून तर मंदिरे 7 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत.