तळीरामांसाठी आनंदाची बातमी : 31 डिसेंबर दिवशी बार राहणार ‘या’ वेळेपर्यंत सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण ३१ डिसेंबरची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. खासकडून तळीराम होय. त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी असून ख्रिसमस व 31 डिसेंबर साजरा करता यावा यासाठी राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

राज्य सरकारकडून नुकतेक एक परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यानुसार राज्यात ख्रिसमस आणि 31 डिसेंबर दिवशी बार सुरु ठेण्याबाबत महत्वाचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. 24, 24 आणि 31 डिसेंबर दिवशी मोठ्या शहरातील बिअर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर इतर ठिकाणी रात्री 1 वाजेपर्यंत बार सुरु ठेवता येणार आहेत.

थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी गोव्याला जाताय? मग ‘या’ ठिकाणी राहू शकतात अगदी फुकट !

आता राज्य सरकारकडूनच थेट बार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने ही ‘तळीरामां’साठी आनंदाची बातमी म्हणावे लागेल. 31 डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस. या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देत सर्वजण नव्या वर्षाचे उत्साहाने स्वागत करतात.