आयपीएलपूर्वीच चाहत्यांसाठी वाईट बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 26 मार्च पासून आयपीएल 2022 स्पर्धेला सुरुवात होणार असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आयपीएल सुरू होण्या पूर्वीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. यापूर्वी आयपीएल साठी 25% प्रेक्षक क्षमता ठेवण्यात आली होती. मात्र आता राज्यातील ठाकरे सरकार ही परवानगी मागे घेण्याची शक्यता आहे.

केंद्राच्या सूचना-
केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला नव्या कोविड – 19 च्या व्हॅरिएंटसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिलाय. याचा आयपीएलवर परिणाम होऊ शकतो. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, युरोपीय देशांसह दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्राच्या माध्यमातून विशेष काळजी घेण्याची सूचना केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र याचा आयपीएल सामन्यांवर काय परिणाम होणार याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

दरम्यान, कोरोना मुळे मागील दोन्ही आयपीएल स्पर्धा भारताबाहेर खेळवण्यात आल्या होत्या. यंदाचे आयपीएल चे नियोजन देखील फक्त महाराष्ट्रात करण्यात आले आहे.त्यातील मुंबई येथे 55 सामने खेळवण्यात येतील तर पुण्यात 15 सामने होतील. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आणि राज्य सरकारनं सामन्यांना २५ टक्के प्रेक्षक उपस्थित राहतील अशी योजना आखली होती. मात्र आता ही योजना रद्द होण्याची शक्यता आहे