हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन काल उत्साहपूर्वक वातावरणात पार पडला. देशपातळीवर गेल्या वर्षभरापासून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असल्या कारणाने त्याचाच भाग म्हणून आता राज्य सरकारने नुकताच एक अध्यादेश काढला आहे. त्याद्वारे उद्या सर्वांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन करावे, असे आवाहन केले आहे.
सरकारच्या अध्यादेशात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १७ ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सर्व नागरिकांनी समूह राष्ट्रगीताचे गायन करावे. यासाठी उद्या आहे त्या ठिकाणी थांबून सकाळी 11 वाजता राष्ट्रगीत म्हणावे. यामध्ये राज्यातील शासकीय, खासगी तसेच इतर सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये स्थानिक शिक्षण संस्था, विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील. खासगी अस्थापना, व्यापारी प्रतिष्ठान यांनीही यामध्ये सहभाग घ्यावा.
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात उद्या, दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ या वेळेत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी केले आहे pic.twitter.com/MHUApknAnN— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 16, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घऱ तिरंगा’ हे अभियान राबवले. त्याच्या या अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सामुहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन केले आहे.