साताऱ्यात राज्य सरकारचा निषेध, नोटीसीची होळी अन् बोबाबोंब

0
59
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आकसाने, बेकायदा बजावलेल्या 160 च्या नोटिशीचा तीव्र निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आणि नोटीस जाळली. कुपोषित बुद्धी असलेल्या राज्य सरकारचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. राज्य शासनाच्या विरुद्ध बोंबाबोंब केली आणि ठाकरे सरकारचा निषेध असो, महा विश्वासघातकी आघाडीचा निषेध असो, लक्षात ठेवा झुकणार नाही ,घोटाळे बाहेर काढणारच अशा घोषणा सातारा भाजपाच्यावतीने देण्यात आल्या.

शहराध्यक्ष विकास गोसावी म्हणाले, पोलीस ट्रान्सफर रॅकेट घोटाळा देवेंद्रजींनी उघड केल्याने, त्यांना सूड बुद्धीने नोटीस पाठवून बोलवण्यात आलं आहे, मात्र, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना नोटीस आली की, गायब होतात, पोटात दुखतं, नको तिथं दुखतं, घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलावले की, राजकीय सूडबुद्धी असे तुणतुणे वाजवले जाते आणि घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावले जाते. विरोधी पक्षनेत्याला नोटीस देऊन अपराध्यासारखें चौकशीसाठी बोलावणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. राज्य शासनाने ही नोटीस रद्द करून माफी मागावी, राजीनामा द्यावा.

या वेळी जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, ऍड प्रशांत खामकर, चिटणीस विजय गाढवे, सुनील जाधव, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, चित्रपट आघाडी जिल्हाद्यक्ष विकास बनकर, भटके विमुक्त आघाडी महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रिया नाईक, किसान मोर्च्या तालुका अध्यक्ष हेमंत शिंदे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी,तालुका उपाध्यक्ष सुभाष माने, शहर चिटणीस रवी आपटे, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष युवा मोर्च्या अध्यक्ष विक्रम बोराटे, विक्रम पवार,अविनाश खर्षिकर, शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष संतोष सुतार, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संजय कासट, सोशल मीडिया चे अभिजित लकडे,चैतन्य जोशी, अक्षय इंगवले, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here