मुंबई | राज्यामध्ये अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. राज्यामध्ये एकूण 42 लाख विद्यार्थी असून, सध्या त्यांना अध्यापन करण्यासाठी केवळ साडेतीन लाख प्राध्यापक उपलब्ध आहेत. एकूण साडेपाच हजार महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्यामध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. या संबंधात लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल.
महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील प्राध्यापकांची रिक्त पदे आणि आवश्यक कर्मचाऱ्यांची पदे या संदर्भात माहिती संकलित केली जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. माहिती संकलित झाल्यानंतर आगामी काळात मोठा निर्णय या भरतीवरती घेतला जाईल. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोलापूरमध्ये दिली.
राज्यभरातील 260 प्राचार्यांच्या भरतीस राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्याची प्रक्रिया आता सुरू आहे. तर विविध विद्यापीठातील 48 संविधानिक पदांच्या भरतीसाठीही मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी प्रत्येक विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात येईल. तसेच राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांमधील कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्या करता येतील का? या दृष्टिकोनातूनही राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती उदय सामंत यांनी पत्रकारांशी चर्चेदरम्यान दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’