व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी एमआयएमकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कर्नाटक राज्यातील उडपीमध्ये मुस्लीम समाजातील कॉलेजच्या विद्यार्थीनींना हिजाब घालव्यास विरोध करणार्‍या भाजपा व विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरीत गावगुंडांवर तात्काळ कारवाई करावी. तसेच कर्नाटकात जातीय सलोखा राखण्यात असमर्थ ठरल्याने राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी एमआयएमच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. कर्नाटकातील काही गावातील शाळा व कॉलेजमध्ये मुस्लीम समाजातील मुलींनी हिजाब घालून आल्यामुळे त्यांना शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश दिला नाही.

जातीयवादी भाजप सरकारने चुकीचा आदेश काढला आहे. त्यामुळे भाजपा विश्वहिंदु परिषदेचे कार्यकर्ते अप्रत्यक्षरीत्या हिजाब घातलेल्या मुलांना शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश करण्यात विरोध करुन जय श्रीराम अशा घोषणा देऊन या विषयाला अतिशय व धार्मिक रंग देण्याचा प्रकार करीत आहेत. शाळा व कॉलेजमध्ये शिकणार्‍या मुलींना हिजाब घालण्यास विरोध करणार्‍या गावगंवर तात्काळ कडक कारवाई करावी.

तसेच कर्नाटक राज्यात काही दिवसांपूर्वी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची दोन वेळा विटंबना झाली. महात्मा बसवेश्वर महाराज यांची विटंबना झाली. हजरत टीपू सुलतान यांचे विषयी वादग्रस्त वक्तव्य प्रख्यात अली व रावेदकडून केले. हिंदू-मुस्लिम दंगल होईना, म्हणून शेवटी हा हिजाबचा विषय काढून कर्नाटकासह देशभर या विषयामुळे जातीय तणाव व अशांतता तथा कर्नाटकातील भाजप सरकारमुळे निर्माण झालेली आहे. या सर्व वादग्रस्त धरून कर्नाटक सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी केली.