सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
भाजपाच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दिराकडून एका महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. याबाबत त्या पीडितेची महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात राजू कोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित राजू कोरेला अटक करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना निवेदन देत राजू कोरे यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. राजू कोरे यांनी अनेक महिलांबाबत असे प्रकार केल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने केला आहे.
सांगलीतील एक तरूणी जाहिरात एजन्सी चालवते. त्यातून दोघांची चांगली ओळख झाली होती. २६ मार्च रोजी सायंकाळी कोरे याने चालकाला गाडी घेऊन तिला आणण्यास पाठवले. त्याप्रमाणे चालकाने तरूणीला चालकाने जयसिंगपूर येथील हॉटेल ग्रास हॉपर येथे आणले. तिथे कोरे आला होता. त्याने तिच्याशी अश्लिल चाळे करून विनयभंग केला. त्यानंतर कोरे याच्याविरूद्ध विनयभंग केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी कोरे याच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊनही कोरे याच्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक झाली आहे.