हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जातात . त्यांनी केलेले पराक्रम आपणा सर्वांनाच ज्ञात आहेत. त्यांची असलेली सेना, खेळलेले गनिमी कावे हे आजच्या आर्मीसारखे आहेत. म्हणूनच येणाऱ्या 4 डिसेंबरला नौसेना दिनाच्या निमित्ताने राजकोट समुद्रकिनाऱ्यावर महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. शिवरायांच्या या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे
कसा असेल हा पुतळा?
समुद्रकिनाऱ्यावर पुतळा बांधून ते पर्यटनाचे आकर्षण बनणार आहे. शिवरायांच्या पुतळ्याची उंची ही 35 फूट एवढी असणार आहे. केवळ इथे पुतळाच उभारला जाणार नसून त्याभोवती एका किल्याप्रमाणे बांधणी होणार आहे. त्यात सिंधुदुर्गच्या तटबंदिप्रमाणे रचना केली जाणार आहे. तसेच पुतळ्याचा दर्शनी भाग हा सिंधूदुर्ग असणार आहे.
5 कोटीचा आहे खर्च
मालवण येथील मेढा – राजकोट समुद्रकिनाऱ्यावर उभारला जाणारा शिवपुतळा व त्याच्याभोवताली केली जाणारी सजावट ह्यासाठी एकूण 5 कोटी रुपयाचा खर्च लागणार असल्याचे सांगितले जात आहेत. हे पर्यटनासाठी प्रमुख आकर्षण असणार आहे. नौदलाच्या दिवशी महाराजांना अभिवादन करून मोदींच्या हस्ते त्याचे उदघाटन केले जाणार आहे.
शहराच्या पर्यटनात पडणार भर
मालवनमध्ये पर्यटनासाठी आतापर्यंत ऐतिहासिक ठिकाणे, समुद्र, स्कुबा डायविंग, बंदर, जेटी, मंदिर, बीच ह्यासारखी ठिकाणे येथे आहेत. मात्र आता महाराजांचा पुतळा उभारला जाणार असल्यामुळे येथील सौंदर्यात भर पडणार आहे. तसेच पर्यटन वाढल्यामुळे रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होणार आहेत. पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून येथे विविध प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. त्यातील एक म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा. तसेच मेढा राजकोट परिसरात एक सेल्फी पॉईंट बनवण्यात आला आहे. शहरात एकही शिवाजी महाराजांचा पुतळा नसल्यामुळे ह्या पुतळ्याची ओढ सर्वांनाच लागलेली दिसून येत आहे.