Stock Market : Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!

Stock Market 
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : गेल्या आठवड्यात Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपध्ये एकत्रितपणे 1,54,477.38 कोटी रुपयांची घसरण झाली. यावेळी इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या आयटी कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. हे जाणून घ्या कि, गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेल्या सेन्सेक्समध्ये 812.28 अंकांनी किंवा 1.36 टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या आठवड्याभरात फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली तर TCS ची मार्केट कॅप 59,862.08 कोटी रुपयांनी घसरून 11,78,818.29 कोटी रुपयांवर आली.

Stock Market LIVE: Sensex, Nifty likely to open higher today - BusinessToday

मोठ्या बूमनंतर आता करेक्शन

या काळात इन्फोसिसची मार्केट कॅप 31,789.31 कोटी रुपयांनी घसरून 6,40,351.57 कोटी रुपयांवर आली. HDFC बँकेची मार्केट कॅप 16,090.67 कोटी रुपयांनी घसरून 8,13,952.05 कोटी रुपयांवर आली. हिंदुस्थान युनिलिव्हरची मार्केट कॅप 14,814.18 कोटी रुपयांनी घसरून 6,04,079.91 कोटी रुपयांवर आली. Stock Market

LIC ची मार्केट कॅप घटली

त्याचप्रमाणे, या आठवड्यात LIC ची मार्केट कॅप 4,459.12 कोटी रुपयांनी घसरून 4,29,309.22 कोटी रुपये झाली. तसेच बजाज फायनान्सची मार्केट कॅपही 14,430.4 कोटी रुपयांनी घसरून 4,27,605.59 कोटी रुपये तर एचडीएफसीची मार्केट कॅप 13,031.62 कोटी रुपयांनी घसरून 4,34,644.36 कोटी रुपयांवर आली. Stock Market

What Is a Short Squeeze?" and Other Pressing Stock Market Questions Answered | www.caltech.edu

SBI च्या मार्केट कॅपमध्ये झाली वाढ

याउलट SBI ची मार्केट कॅप 3,034.37 कोटी रुपयांनी वाढून 4,67,471.16 कोटी रुपये तर ICICI बँकेची मार्केट कॅप 523.02 कोटी रुपयांनी वाढून 6,06,330.11 कोटी रुपये झाली. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 3,500.56 कोटी रुपयांनी वाढून 17,71,645.33 कोटी रुपये झाली. Stock Market

टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले पहिले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एचडीएफसी, एलआयसी आणि बजाज फायनान्स यां कंपन्यांचा क्रमांक लागतो. Stock Market

Here's what could rattle the stock market this year - KTVZ

अमेरिकन बाजारात झाली मोठी घसरण

हे लक्षात घ्या कि, शुक्रवारी अमेरिकन बाजारही मोठ्या घसरणीसह बंद झाले. यावेळी Nasdaq 497.56 अंक (3.94 टक्के), S&P 141.6 अंक (3.37 टक्के) आणि डाऊ जोन्स 1008.38 अंकांनी (3.03 टक्के) बंद झाले. तसेच पुढील बैठकीत मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात 50 बेसिस पॉईंट्सने वाढ केली जाऊ शकेल अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. मात्र काही तज्ञ ते 75 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढवण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. Stock Market

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/

हे पण वाचा :

Infosys : आयटी क्षेत्रातील ‘या’ कंपनीने गेल्या काही वर्षांत मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुझुकीची Alto K10 येणार CNG मध्ये; देईल ‘इतके’ मायलेज

सध्याच्या काळात Bank FD मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का??? तज्ञ काय सांगतेय ते पहा

Multibagger Stocks : ‘या’ 5 कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना पुढील महिन्यात मिळणार बोनस शेअर्स !!!

ICICI Bank च्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा