Stock Market : बाजार विक्रमी उच्चांकावर बंद, सेन्सेक्स 460 अंकांनी वाढला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारतीय शेअर बाजार रेकॉर्ड वर रेकॉर्ड नोंदवत आहे. आज, आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशीही बाजार विक्रमी उच्चांकावर बंद झाले. सेन्सेक्स 459.64 अंकांच्या वाढीसह 61765.59 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 138.50 अंकांच्या वाढीसह 18477.05 वर बंद झाला.

आजच्या व्यवसायामध्ये लहान आणि मध्यम शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप इंडेक्स आज 1 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉलकॅप इंडेक्स 0.74 टक्क्यांनी बंद करण्यात यशस्वी झाला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर आजच्या ट्रेडिंगमध्ये मेटलच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. S&P BSE METAL इंडेक्स 4.31 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. दुसरीकडे, पॉवर, बँकिंग शेअर्समध्येही वाढ दिसून आली.

वेदांता-NALCOच्या किंमती 52-आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या
जागतिक स्तरावर जस्त, शिसे, तांबे आणि निकेल सारख्या बेस मेटल्सच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे सोमवारी मेटल कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ दिसून आली. ही रॅली बघता असे दिसते की, अलिकडेच बेस मेटल्सच्या किंमतीत झालेली वाढ या कंपन्यांच्या शेअर्ससाठी वरदान म्हणून आली आहे.

Paras Defence शेअर्समध्ये गुंतलेली अप्पर सर्किट
Paras Defence and Space Technologies चे शेअर्स सोमवारी 20% च्या वाढीसह अप्पर सर्किटवर गेले. कंपनीच्या बोर्डाने संरक्षण उपकरणांच्या देखभाल आणि सर्विसिंगसाठी सहयोगी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्सनी वरच्या सर्किटला स्पर्श केला.

कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवारी 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत Krasny Defence Technologies Limited च्या सहकार्याने कंपनीच्या निर्मितीला मान्यता दिली. कंपनीने एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, प्रस्तावित सहाय्यक संरक्षण उपकरणांसह नौदल जहाजांची देखभाल, सर्विसिंग आणि दुरुस्तीची काळजी घेईल.

Tata Power Shares: सोमवारी दिवसभराच्या व्यवहारात BSE वर Tata Power चे शेअर्स 18% टक्क्यांच्या वाढीसह 263 रुपयांच्या किमतीवर पोहोचले. गेल्या एका महिन्यात स्टॉक 95% वाढला आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की टाटा पॉवरच्या या रॅलीमागे अनेक घटक आहेत, ज्यामुळे हा स्टॉक खूप आकर्षक बनला आहे. टाटा ग्रुपचा शेअर आणखी वाढेल अशी विश्लेषकांची अपेक्षा आहे.