शिवसेनेतील उपऱ्यांची संख्या आणि भाजपच्या उपऱ्यांची संख्या समोर येऊद्या; दरेकरांचे राऊतांना आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपमध्ये व्यापारी आणि उपऱ्यांची भर्ती केली असल्याची टीका केली होती. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले आहे. आपण आपल्या पक्षातील उपऱ्यांची संख्या आणि भाजपच्या उपऱ्यांची संख्या यांची आकडेवारी समोर येऊद्या असे आव्हान दरेकरांनी दिले आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांचं वर्चस्व असणारी आहे. उदय सामंत मूळचे शिवसैनिक आहेत का? अब्दुल सत्तार १९६६ चे सैनिक आहेत का? शंकरराव गडाख कधी झाले शिवसैनिक? प्रियांका चतुर्वेदी खासदार आहेत, उर्मिला मातोंडकर कोण आहेत? अर्ध मंत्रिमंडळ उपऱ्यांचं भरलेलं असताना व्यापारी प्रवृत्तीला महत्त्व येत असताना भाजपावर उपऱ्यांना घेता असा आरोप करणं किती संयुक्तिक आहे?”, असा सवाल दरेकर यांनी केला आहे.

भाजपवर टीका करण्यापेक्षा शिवसेनेत काय चाललंय याबाबत माहिती घेतली तर शिवसेनेसाठी फायदेशीर ठरेल असे दरेकरांनी म्हटलं आहे. भाजपवाले उपरे उमेदवार घेतात आणि एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा करत आहेत असे शिवसेनेकडून म्हटल आहे. राऊतांनी महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार, हत्या, बलात्कार, या विषयी जर राज्य सरकारला सल्ला देऊन काय कारवाई झाली तर आम्ही अभिनंदन करु असेही दरेकर यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment