नवी दिल्ली । गुरुवारी दिवसातील वरच्या स्तरावर व्यापार करताना शेअर बाजार बंद झाला. BSE Sensex 358.83 अंकांच्या वाढीसह 52,300.47 वर बंद झाला. त्याचबरोबर NSE वरील Nifty 99.25 अंकांच्या वाढीसह 15,734.60 वर बंद झाला. Nifty च्या 50 पैकी 37 शेअर्स तेजीत होते. 30 शेअर्स पैकी 23 शेअर्समध्ये वाढ झाली.
आज हे शेअर्स वाढले होते
BSE वर आज Bajaj finance चे शेअर्स 7.69 टक्क्यांवर गेले. यानंतर बजाज फिनसर्व्हरचे शेअर्स 3.87 टक्के झाले. त्यानंतर एसबीआय, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डी, टेक महिंद्रा, आयटीसी, कोटक बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, एचडीएफसी, टीसीएस, रिलायन्स, सन फार्मा, टायटन, एम अँड एम, एलटी या कंपन्यांचा फायदा झाला. बजाज ऑटो, मारुती, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, ओएनजीसी आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये घट झाली.
आजचे गेनर्स आणि लूजर्स शेअर
बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, DIVIS LAB, SBI आणि इंडसइंड बँकेचे समभाग आज NSE मध्ये TOP गेनर्स ठरले. त्याचबरोबर बाजाज-ऑटो, ईचर मोटर, यूपीएल, श्री सिमेंट आणि अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
3,333 कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्यापार
साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी BSE वर 3,333 कंपन्यांच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग झाले. यात 2,460 कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने बंद झाले. त्याचबरोबर 724 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आजची एकूण मार्केटकॅप 2 कोटी 30 लाख रुपये आहे.