मुंबई । भारतीय शेअर बाजार आज गुरुवारी अस्थिरतेच्या दरम्यान ग्रीन मार्कवर बंद झाले. विकली एक्स्पायरीच्या दिवशी आजच्या ट्रेडिंगमध्ये मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. दुसरीकडे एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. ऑइल अँड गॅस, मेटल शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. त्याचबरोबर बँका, रियल्टी, आयटी शेअर्सवर दबाव दिसून आला.
ट्रेडिंगमध्ये शेवटी सेन्सेक्स 157.45 अंकांच्या म्हणजेच 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 58,807.13 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 47.10 अंकांच्या किंवा 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 17,516.85 वर बंद झाला. आयटीसी, एल अँड टी, एशियन पेंट्स, यूपीएल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ झाली तर एचडीएफसी बँक, टायटन कंपनी, नेस्ले इंडिया, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन टॉप लुझर्स ठरले होते.
दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये आज बाजारात खाण्यापिण्याशी संबंधित शेअर्समध्ये वाढ झाली. देवयानी आणि बर्गर किंगच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, बॉब्रेक नेशन आणि सॅफायर फूडमध्ये चांगली खरेदी दिसून आली आहे.
गेल्या दोन वर्षांतील इंडियन फूड सर्विस इंडस्ट्रीचा प्रवास पाहिला तर तो रोलर कोस्टर राईडसारखा राहिला आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने या संपूर्ण इंडस्ट्रीला हादरवून सोडले, त्यामुळे रेस्टॉरंट क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना सुरुवातीच्या काही महिन्यांत मोठा तोटा सहन करावा लागला. यानंतर, इंडस्ट्रीच्या बाजूने न्यू नॉर्मल स्वीकारल्यानंतर, त्यात वेगाने वाढ झाली.