नवी दिल्ली I भारतीय शेअर बाजाराने बुधवारी तेजीसह ट्रेडिंगला सुरुवात केली आणि उघडताच कालच्या तोट्याची भरपाई केली.
आज सकाळी सेन्सेक्सने 778 अंकांच्या मजबूत वाढीसह ट्रेंडिंगला सुरुवात केली आणि 56,555 वर उघडला. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 214 अंकांच्या वाढीसह 16,877 वर ट्रेड सुरू केला. सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांनी प्रचंड उत्साह दाखवला आणि सततच्या खरेदीमुळे सकाळी 9.35 वाजता सेन्सेक्स 839 अंकांनी वाढून 56,616 वर पोहोचला. निफ्टीही 253 अंकांच्या वाढीसह 16,916 वर पोहोचला.
या शेअर्सवर गुंतवणूकदार सट्टा लावत आहेत
आजच्या ट्रेंडिंगमध्ये, बहुतेक गुंतवणूकदारांच्या नजरा ऑटो, बँक, आयटी आणि मेटल सेक्टरवर आहेत. बाजारात टाटा मोटर्स, एचडीएफसी, एक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. बीएसईवरील ऑटो इंडेक्समध्ये 1 टक्क्यांहून जास्तीची उसळी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, निफ्टी बँक इंडेक्स 2 टक्क्यांहून जास्तीने वाढताना दिसत आहे.
आशियाई बाजारही ग्रीन मार्कवर उघडले
बुधवारी सकाळी आशियातील बहुतांश शेअर बाजार तेजीसह उघडले. सिंगापूरच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये 1.56 टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे, तर जपानचा निक्केई 1.23 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. याशिवाय तैवानच्या बाजारात 0.53 टक्क्यांची उसळी आहे, तर दक्षिण कोरियाचा शेअर बाजार 0.54 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे.