“राज्यपालांची कायदा भंग करणारी भूमिका असल्याने त्यांना पदावर ठेवणं अयोग्य”; संजय राऊतांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अनेकवेळा राज्यपालाची भेट घेण्यात आली. त्यांच्याकडे अध्यक्षपदाच्या निवडीबाबत विनंतीही केली. मात्र, राज्यपालांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यपाल ते पद भरत नाहीत याचा अर्थ राज्यपाल राजकारण करत आहेत. राज्यपाल ज्या पक्षातून आले आहेत, त्या पक्षाच्या दबावामुळे ते राजकारण करत आहे. त्यामुळे त्यांना पदावर ठेवण्याचा अधिकार राहत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. यावेळी राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेते वारंवार राज्यपालांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची विनंती राज्यपालांना करत आहे. मात्र, राज्यपाल ते पद भरत नाहीत. राज्यपाल विरुद्ध सरकार अशा प्रकारचा संघर्ष अनेक राज्यात झालेला आहे आणि सुरू आहे. पण महाराष्ट्रात ज्या पातळीवर राज्यपालांनी आणि त्या पक्षाने हा संघर्ष नेऊन ठेवला त्याची इतिहासात काळ्या अक्षरात नोंद होईल.

राज्यपालांनी ज्या वारंवार भूमिका घेतल्या, त्या कायद्याच्या आणि घटनेचा भंग करणाऱ्या आहेत.अशा घटना भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणं, पदावर राहू देणं आणि त्यांच्या माध्यमातून बहुमतातील सरकारला अडचणी करू देणं हे सातत्याने हे आयोग्य आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Leave a Comment