हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market Timing : सध्या शेअर बाजाराच्या ट्रेडिंगच्या वेळेत बदल होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर पकडू लागली आहे. मार्केटमधील ट्रेडिंगचा टायमिंग आता 3.30 पासून वाढवून संध्याकाळी 5 पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. हे जाणून घ्या कि, 2018 मध्येच बाजार नियामक असलेल्या SEBI कडून ट्रेडिंगची वेळ वाढवण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला होता. ज्यावर आता लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे.
आता शेअर बाजार 5 वाजता बंद होणार ???
सध्या भारतीय शेअर बाजाराची वेळ सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता शेअर बाजारामधील ट्रेडिंगची वेळ वाढवण्यासाठी तयारी केली जात आहे. ज्याअंतर्गत, आता ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केली जाऊ शकते. मात्र, बाजारातील सहभागींशी या संदर्भात सुरु असलेली चर्चा अजूनही प्राथमिक टप्प्यावरच आहे. Stock Market Timing
2018 मध्ये तयार झाला फ्रेमवर्क
2018 मध्येच SEBI कडून ट्रेडिंगची वेळ वाढवण्याबाबत फ्रेमवर्क जारी करण्यात आला होता. याआधी जानेवारी महिन्यातही सेबीने याबाबत एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) आणले होते. ज्यामध्ये, एक्सचेंजच्या कामकाजात कोणत्याही कारणास्तव व्यत्यय आल्यास, बाजारातील सहभागी, ट्रेडिंग मेंबर्सना 15 मिनिटांच्या आत त्याची माहिती द्यावी लागेल. सेबीच्या परिपत्रकात असेही नमूद करण्यात आले होते की, जर बाजार बंद होण्याच्या एक तास आधी ट्रेडिंग सामान्य नसेल, तर सर्व एक्सचेंजेसना त्या दिवशी ट्रेडिंगची वेळ दीड तासाने वाढवावी लागेल. Stock Market Timing
NSE ला वाढवायचे आहेत ट्रेडिंगची वेळ
हे जाणून घ्या कि, देशातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज असलेले नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) हे इक्विटी सेगमेंटमधील ट्रेडिंगची वेळ वाढवण्याच्या बाजूने आहे. शेअर बाजारातील ट्रेडिंगची वेळ वाढवण्याची चर्चा काही पहिल्यांदाच होते असे नाही. याआधीही अनेकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र आता या संदर्भात लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Stock Market Timing
झिरोधाच्या सीईओचा विरोध
NSE जरी शेअर बाजारामधील ट्रेडिंगची वेळ वाढवण्याच्या बाजूने असले तरीही अनेक लोकं आहेत वेळ वाढवण्याच्या बाजूने नाहीत. एका ट्विटद्वारे झिरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले कि, या निर्णयाचा ट्रेडर्सवर विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच ट्रेडिंगच्या वाढीव वेळेमुळे कमी सहभाग आणि दीर्घकालावधीत लिक्विडिटीची समस्या उद्भवू शकते. Stock Market Timing
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 2411% रिटर्न
Poco C55 : 10 हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये मजबूत फीचर्स असलेला ‘हा’ फोन भारतात लाँच
EPFO : EPS पेक्षा जास्त पेन्शन मिळण्याची संधी, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज
PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज
SBI ‘या’ स्पेशल FD मध्ये गुंतवणुकीची शेवटची संधी !!!! घरबसल्या अशा प्रकारे करा अर्ज