नवी दिल्ली । शेअर बाजारात चांगली खरेदी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 392.92 अंकांच्या वाढीसह 52,699.00 वर बंद झाला. या व्यतिरिक्त निफ्टी 103.50 अंकांनी चढून 15,790.45 च्या पातळीवर बंद झाला आहे. आजच्या रिलायन्सच्या AGM मध्ये मुकेश अंबानी यांच्या भाषणानंतर हा स्टॉक रेड मार्कवर बंद झाला, त्यानंतर गुंतवणूकदारांचे जवळपास 30 हजार कोटी रुपये बुडाले.
AGM नंतर कंपनीचे बाजार भांडवल काल 13.90 लाख कोटी रुपयांवरुन 13,65,103.98 लाख कोटी रुपयांवर आले आहे. सकाळच्या व्यापारातील 2214.80 च्या पातळीवर कंपनीचा शेअर उघडल्यानंतर तो 51.75 अंक (-2.35 टक्के) 2153.35 च्या पातळीवर बंद झाला.
खरेदी झालेले शेअर्स
आजच्या व्यापारानंतर सेन्सेक्सच्या टॉप -30 शेअर्स विषयी बोलायचे झाले तर इन्फोसिस 3.75 टक्क्यांच्या तेजीसह टॉप गेनर्सच्या लिस्ट मध्ये कायम आहे. याशिवाय टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, एलटी, नेस्ले, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, मारुती, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, कोटक बँक या सर्वांमध्ये चांगली खरेदी दिसून आली.
घसरण झालेले शेअर्स
याशिवाय रिलायन्स, भारती एअरटेल, एसबीआय, पॉवर ग्रिड, डॉ. रेड्डी, सन फार्मा, आयटीसी आणि टायटन हे सर्व विक्री झालेल्या शेअर्सच्या लिस्टमध्ये बंद झाले.
सेक्टरल इंडेक्स
सेक्टरल इंडेक्समध्ये आज संमिश्र ट्रेडिंग झाला आहे. कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थ सर्व्हिसेस, ऑईल अँड गॅस आणि पीएसयू सेक्टर रेड मार्कवर बंद झाले. याशिवाय ऑटो, बँक निफ्टी, कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, आयटी, मेटल आणि टेक क्षेत्रात चांगली खरेदी दिसून आली.
स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्स घसरले
स्मॉलकॅप, मिडकॅप आणि सीएनएक्स मिडकॅप इंडेक्स विक्रीसह बंद झाले. स्मॉलकॅप इंडेक्स 55.76 अंकांनी घसरून 24896.86 च्या पातळीवर बंद झाला. मिडकॅप इंडेक्स 114.26 अंकांच्या घसरणीसह 22320.39 वर बंद झाला.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा