हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : सध्या भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना यामध्ये लोअर सर्किट लागण्याची भीती वाटते आहे. मात्र शेअर बाजारातील अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किट म्हणजे काय याची आपल्याला माहिती आहे का??? नसेल तर आजची आजच्या या बातमीमध्ये आपण ती जाणून घेउयात…
जर आपण शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर आपल्याला एखाद्या शेअर्सची किंमत अचानक कशी वाढते आणि कशी कमी होते हे पाहून आश्चर्य वाटत असेल. बहुतेक शेअर्सची मागणी आणि पुरवठ्यामुळे शेअर्सचे मूल्य वाढते-कमी होते. जेव्हा जेव्हा अचानक शेअर्सची मागणी वाढते तेव्हा तेव्हा त्याची किंमत वाढते आणि जेव्हा लोकं शेअर्स विकायला लागतात तेव्हा शेअर्सची किंमत कमी होऊ लागते. हे जाणून घ्या कि, कोणत्याही शेअर बाजारामध्ये 2 प्रकारचे सर्किट असतात. यातील पहिला म्हणजे अप्पर सर्किट आणि दुसरा म्हणजे लोअर सर्किट. तसेच या सर्किटवर किती टक्के शुल्क आकारले जाईल हे एक्सचेंजद्वारे ठरवले जाते. Stock Market
अप्पर सर्किट म्हणजे काय ते जाणून घ्या
कधी कधी एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढतो. अशा परिस्थितीत त्या कंपनीच्या शेअर्सचे भाव वर वर जाऊ लागतात. ज्याला अप्पर सर्किट असे म्हंटले जाते. यामध्ये कोणत्याही शेअर्सची किंमत ठराविक मर्यादेपर्यंत पोहोचताच, त्यामध्ये अप्पर सर्किट लागले जाऊन त्याचे ट्रेडिंग थांबेल. अप्पर सर्किटमध्ये 3 टप्पे असतात. त्यावर 10 टक्के, 15 टक्के आणि 20 टक्के आकारणी केली जाते. Stock Market
लोअर सर्किट म्हणजे काय ते जाणून घ्या
कधी कधी एखाद्या कंपनीचे शेअर्स अचानकपणे खाली येऊ लागतात. अशा परिस्थितीत, त्या शेअर्समध्ये आणखी घसरण होऊ नये म्हणून सर्किट लावले जाते. अशा स्थितीत अचानक प्रत्येकजण त्या कंपनीतील शेअर्स विकायला लागतो, तेव्हा त्या शेअर्सची किंमत काही प्रमाणात कमी होऊन त्याचे ट्रेडिंग थांबते. शेअर्सचे मूल्य कमी होण्याच्या या मर्यादेला लोअर सर्किट म्हंटले जाते. लोअर सर्किटमध्येही 3 टप्पे असतात. त्यावर 10 टक्के, 15 टक्के आणि 20 टक्के घट या दराने आकारणी केली जाते. Stock Market
सर्किटची तरतूद केव्हापासून सुरू झाली ???
हे जाणून घ्या कि, 28 जून 2001 पासून शेअर बाजारातील अप्पर सर्किट आणि लोअर सर्किटला सुरूवात झाली. त्याच दिवसापासून बाजार नियामक सेबीने सर्किट ब्रेकरची व्यवस्था केली. ही सिस्टीम 17 मे 2004 रोजी पहिल्यांदा वापरली गेली. Stock Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/
हे पण वाचा :
Axis Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली पुन्हा वाढ
Bank Holiday : मार्चमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद, घर सोडण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांची लिस्ट
Credit Card : चांगल्या क्रेडिट स्कोअरचे आहेत अनेक फायदे, वापरा ‘या’ 3 टिप्स
Multibagger Stock : देशातील सर्वात मोठ्या ग्रुपच्या ‘या’ शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट
SBI खातेधारकांनी पॅन नंबर अपडेट केला नाही तर YONO खाते बंद होणार, तपासा ‘या’ मेसेज मागील सत्यता