हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात सतत घसरण होते आहे. फक्त 2022 मध्येच सेन्सेक्स 10 टक्क्यांनी घसरला आहे. याच कालावधीत निफ्टीमध्येही घट झाली आहे. आजही (12 मे, 2022) निफ्टी आणि सेन्सेक्स गॅपडाउनमध्ये उघडले.
जगभरातील सर्वच बाजारपेठांमध्ये अशा प्रकारची स्थिती असल्याने कोणत्याही एका देशाच्या परिस्थितीला त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही. कारण याला कारणीभूत कोणताही एक विशेष घटक नसून त्यामागे अनेक घटक आहेत. चला तर मग कोणत्या घटकांमुळे बाजारात घसरण होते आहे ते जाणून घेउयात…
रशिया-युक्रेन युद्ध
24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनला नाटोमध्ये जायचे होते ज्याला रशियाने विरोध केला. मात्र युक्रेनला नाटोने पाठिंबा दिला. ते प्रत्यक्ष युक्रेनच्या मदतीला आले नाही. हे प्रकरण साधरणतः 10-15 दिवसांत मिटेल, असे प्रत्येकाला वाटत होते. मात्र जवळपास दोन महिने उलटूनही त्यावर मार्ग निघालेला नाही. Stock Market
या युद्धामुळे जगभरात महागाई वाढू लागली. त्यातच कच्च्या तेलाचे भावही गगनाला भिडू लागले. गव्हाच्या मोठ्या उत्पादक देशांपैकी एक असलेला युक्रेन या वेळी इतर देशांना गहू देऊ शकणार नाही. या सतत वाढणाऱ्या महागाईमुळे जगभरातील सरकार आपल्या अर्थव्यवस्थेबाबत अनेक कठोर निर्णय घेत आहेत. ज्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होत आहे. जर रशिया-युक्रेन युद्ध लांबले तर बाजारात आणखी घसरण होऊ शकेल. Stock Market
यूएस महागाई दर
हे लक्षात असू द्या की, अमेरिकेच्या शेअर बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावर देखील होतो. तेथील चलनवाढीचा दर हा गेल्या 40 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. अशा स्थितीत अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडे व्याजदर वाढवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नव्हता. अमेरिकेतील या व्याजदर वाढीमुळे मोठ्या गुंतवणूकदारांचा भारतासह इतर उदयोन्मुख बाजारपेठांमधील रस कमी झाला आहे.
या वर्षात आतापर्यंत विदेशी फंडांनी भारतीय बाजारातून 1,44,565 कोटी रुपये काढले आहेत. एकट्या मे महिन्यात त्यांनी 17,403 कोटी रुपयांची विक्री केली आहे. मात्र, म्युच्युअल फंडासारख्या देशांतर्गत मोठ्या गुंतवणूकदारांनी खरेदी करून बाजारातील घसरण थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. Stock Market
पुढे वाटचाल कशी राहील ?
अमेरिकेच्या चलनवाढीत थोडीशी घट झाली असली तरी तज्ञ त्याला सकारात्मक मानत नाहीत. मार्चमध्ये अमेरिकेतील महागाईचा दर 8.5 टक्के होता. बुधवारी, अमेरिकेतील एप्रिलचा महागाई दर 8.3 टक्क्यांवर आला आहे, जो अंदाजापेक्षा (8.1 टक्के) जास्त आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या काळात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बुधवारी पुन्हा एकदा अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम भारतासह इतर बाजारांवर देखील झाला.
तर दुसरीकडे, डॉलरने गेल्या दोन दशकांतील उच्चांक गाठला आहे. डॉलरच्या मजबूतीमुळे भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांवरही परिणाम होतो आहे. जगातील प्रमुख 6 चलनांच्या बास्केटच्या तुलनेत डॉलर इंडेक्स 103 च्या पुढे गेला आहे. जो भारतासह सर्वच उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी चांगला नाही. Stock Market
शेअर बाजाराच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/market-data/live-market-indices
हे पण वाचा :
PM Shram Yogi Maandhan : ‘या’ योजनेद्वारे सरकारकडून मिळेल दरमहा 3,000 रुपये पेन्शन
PM Kisan : CSC मध्ये e-KYC करण्यासाठी द्यावे लागतात पैसे, फ्रीमध्ये कसे करावे ते पहा
FD Interest Rates : PNB कडून FD च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा
FD Rates : आता ‘ही’ सरकारी बँक FD वर जास्त व्याज देणार, नवीन दर तपासा
Gold Price Today : सोने महागले, तर चांदीच्या किंमतीत घसरण; पहा आजचे दर