हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शेअर बाजारात प्रचंड चढ उतार होत आहेत. मात्र असे असले तरीही काही कंपन्यांचे शेअर्स मोठा नफा मिळवून देत आहेत. आज ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांना 67% पर्यंत जास्तीत जास्त रिटर्न देणारे 5 स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर त्याविषयी जाणून घेउयात…

Page Industries : Stock Tips : ICICI सिक्युरिटीजने पेज इंडस्ट्रीजसाठी 52,000 रुपयांच्या टार्गेट प्राईस सहित “एक्युम्युलेट” कॉल दिला आहे. या लार्ज कॅप स्टॉकची सध्याची मार्केट प्राईस 2.78% च्या इंट्राडे घसरणीसह 47,531 रुपये झाली आहे. सध्या या कंपनीची मार्केट कॅप 53,016 कोटी रुपये आहे. नुकतेच कंपनीने प्रति इक्विटी शेअर 70 रुपये फायनल डिव्हीडंड देखील जाहीर केला आहे. एपरल सेक्टरमधील या शेअर्सने गेल्या 5 वर्षात सर्वाधिक 111 टक्के रिटर्न दिला आहे.

Power Finance Corporations : ICICI सिक्युरिटीजने या शेअर्सला 191 रुपयांची टार्गेट प्राईस आणि 59% च्या संभाव्य रिटर्न सहीत “Buy” रेटिंग दिले आहे. या शेअर्सची सध्याची मार्केट प्राईस 120 रुपये आहे. त्याची मार्केट कॅप 31,720.59 कोटी रुपये आहे. या शेअर्सने गेल्या 1 महिन्यात सर्वाधिक 17% रिटर्न दिला आहे. Stock Tips

Gujarat State Petronet : ICICI सिक्युरिटीजने या शेअर्सला 383 च्या टार्गेट प्राईस सहीत “Buy” रेटिंग दिले आहे. शेअरची सध्याची मार्केट प्राईस 233 रुपये आहे. आज गुजरात स्टेट पेट्रोनेट विकत घेतल्यास 64 टक्के संभाव्य रिटर्न मिळेल. कंपनीची मार्केट कॅप 13,171 कोटी रुपये आहे. या शेअर्सने गेल्या 5 वर्षात सर्वाधिक 10% रिटर्न दिला आहे. Stock Tips
Gujarat Gas Ltd : ICICI सिक्युरिटीजने यासाठी 554 रुपयांच्या टार्गेट प्राईस सहीत “Buy” रेटिंग दिले आहे. शेअर्सची सध्याची मार्केट प्राईस 483 रुपये तर मार्केट कॅप 33,311 कोटी रुपये आहे. गेल्या 5 वर्षात या शेअर्सने सर्वाधिक 174% रिटर्न दिला आहे. Stock Tips

Somany Ceramics Ltd : ICICI सिक्युरिटीजने या शेअर्सला 896 रुपयांच्या टार्गेट प्राईस सहीत Buy रेटिंग दिले आहे. या शेअर्सचा सध्याची मार्केट प्राईस 538 रुपये आहे. जर आज यामध्ये गुंतवणूक केली तर याद्वारे 67 टक्के संभाव्य रिटर्न मिळेल. हे लक्षात घ्या कि, गेल्या 3 वर्षात याने सर्वाधिक 191% रिटर्न दिला आहे. बांधकाम साहित्य क्षेत्रातील या कंपनीची मार्केट कॅप 2,286 कोटी रुपये आहे. Stock Tips
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/somany-ceramics-ltd/somanycera/531548/
हे पण वाचा :
Budget 5G Smartphones : 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर बजटमध्ये उपलब्ध असणारे ‘हे’ फोन पहा
Bank Of Baroda मधून MCLR मध्ये वाढ, आता लोनसाठी द्यावे लागणार जास्त व्याज
गेल्या 10 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने दिला 3500% रिटर्न, याबाबत ब्रोकरेज फर्मचे मत जाणून घ्या
DCB Bank कडून ‘या’ स्पेशल एफडीवर मिळेल 8.25% व्याज, त्यासाठीच्या अटी जाणून घ्या
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने अवघ्या काही हजारांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये




