हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : सध्या जगभरात मंदीचे वातावरण आहे. या मंदीच्या दबावामुळे भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होते आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस संमिश्र असाच होता. मात्र या काळामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आपल्याला भरपूर पैसे कमावता येतील. त्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही तज्ञ देत आहेत. चला तर मग शेअर या घसरणीच्या काळात कोणते शेअर्स नफा मिळवून देऊ शकतील हे जाणून घेउयात…
कोटक सिक्युरिटीज लिमिटेडच्या इक्विटी रिसर्चचे प्रमुख असलेले श्रीकांत चौहान यांच्या मते, एजिस लॉजिस्टिकचे शेअर्स एक राउंडिंग बॉटम फॉर्मेशन करत आहे, जो डेली चार्टवर दिसून येतो आहे. लवकरच हे शेअर्स देखील 300 रुपयांच्या पातळीवर जाण्याची अपेक्षा आपल्याला करता येईल.Stock Tips
ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्सच्या श्रीकांत चौहान यांच्या मते, जून 2020 पासून अनेक वेळा स्टॉकने 1,370 रुपयांवर सपोर्ट घेतला आहे, याचा अर्थ 1,370 रुपयांच्या पातळीला काही मूलभूत महत्त्व आहे. 1370 रुपयांच्या पातळीला स्पर्श केल्यानंतर तो 1,700 रुपयांपर्यंत झेप घेतो, ज्यामुळे चांगला रिटर्न मिळतो. 1,430 ते 1,400 रुपयांच्या दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. Stock Tips
रिलायन्स सिक्युरिटीजचे टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्ह रिसर्च एनालिस्ट असलेल्या जतिन गोहिल यांच्या मते, ACC च्या शेअर्समध्ये मोठ्या उलथापालथीनंतर तेजी दिसून येते आहे. या अल्पावधीत हे शेअर्स लाइफ-टाइम हायवर जाऊ शकतो. याशिवाय घसरणीच्या बाबतीत, शेअर्सना त्याच्या अलीकडील स्विंग लोच्या आसपास सपोर्ट मिळेल. Stock Tips
तसेच गोहिल यांच्या मते, ट्रेंडलाइन ब्रेकआउटनंतर पर्सिस्टंट सिस्टीमचे शेअर्स अस्पर्शित राहिला. यावरून बुल या शेअर्सना हळूहळू नियंत्रणात घेत असल्याचे दिसून येते. ज्यामुळे त्यामध्ये मजबूत वाढ दिसून येईल. तसेच तो रिबाउंड होऊन त्याच्या पूर्वीच्या स्विंग हाय दिशेने जाऊ शकेल. घसरणीच्या बाबतीत स्टॉकला त्याच्या खालच्या बँड रेंज भोवती सपोर्ट मिळेल. Stock Tips
गोहिल यांच्या म्हणण्यानुसार, मुथूट फायनान्सचे शेअर्स सध्या त्याच्या गेल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मात्र गेल्या आठवड्यात यामध्ये लक्षणीयरित्या रिकव्हरी दिसून आली आहे. व्हॉल्यूममधील वाढ आणि बुलिश फॉर्मेशन हे सूचित करतात की, प्रमुख बाजारातील पार्टिसिपेंट्स हे बुल्सच्या बाजूने आहेत. तसेच या शेअर्समध्ये आगामी काही कालावधीतच ऑगस्ट 2022 च्या उच्चांकाकडे जाण्याची क्षमता आहे. खालच्या स्तराबाबत बोलायचे झाल्यास या शेअर्सला त्याच्या 52-आठवड्यांच्या नीचांकी जवळ सपोर्ट मिळेल. Stock Tips
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.muthootfinance.com/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे ताजे दर तपासा
Bank FD : ‘या’ बँकेने लाँच केली स्पेशल FD स्कीम !!! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 8.40 % व्याज
DCB Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, नवीन दर तपासा
‘या’ Multibagger Stock मध्ये पैसे गुंतववून गुंतवणूकदारांनी कमावला कोट्यावधींचा नफा !!!