16 लाखांचा चोरीला गेलेला बकरा कराडात सापडला; 3 जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील १६ लाखांचा बकरा दोन दिवसांपुर्वी चोरीस गेला होता. 16 लाख रुपयांचा बकरा शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान चार चाकी वाहनातून चोरून नेण्यात आला होता त्यामुळे आटपाडी परिसरात खळबळ माजली होती. परंतु चोरीस गेलेला हा बकरा शोधण्यात अखेर आटपाडी पोलिसांना यश आले असून कराड येथे बकरा सापडला आहे. बकरा चोरून नेणाऱ्या गाडीचा सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून या चोरीचा छडा लागला आहे. दरम्यान याप्रकरणी आटपाडीच्या तिघांना कराड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या १६ लाखाचा बोकड चर्चेचा विषय ठरला होता. त्याला आटपाडीच्या बाजारात ७० लाख रुपये इतक्या प्रचंड दराने मागणी झाली. पण तो त्यांनी विकला नाही. मात्र, त्यातील १६ लाखांचा बोकड आटपाडीच्या सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला. हाच बोकड चोरी गेला होता. शनिवारी पहाटे चोरांनी गोठ्यात शिरुन त्याला पळवलं होते. विशेष म्हणजे एका आलिशान चारचाकी गाडीतून हा बोकड लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली होती.

आटपाडी पोलिसांनी बकरा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. हा बकरा घेऊन तीन संशयित कराड परिसरात आल्याची माहिती आटपाडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कराड येथून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा बकरा हस्तगत करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment