विजापूरहून साताऱ्याकडे निघालेल्या कर्नाटक एसटी बसवर दगडफेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून काल कर्नाटकमधील बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून महाराष्ट्रातही काही ठिकाणी कर्नाटक बसला काळे फसण्यात आले. या दरम्यान विजापूरहून साताऱ्याकडे निघालेल्या कर्नाटकच्या एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना रात्री उशिरा घडली

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक येथील बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या 10 वाहनांची तोडफोड करण्यात आली. यानंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणराया बसची वाहतूक थांबवली. मात्र, कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेल्या बसवर हल्ला करण्याची घटना रात्री उशिरा घडली.

कर्नाटक येथून महाराष्ट्रात आलेली आणि विजापूरहून साताऱ्याकडे निघालेल्या एसटी बस (क्रमांक केए 28 एफ 2368) वर अज्ञातांनी दगडफेक केली. यामध्ये बीडच्या समोरील काचेला तडे गेले आहेत. दगडफेकीची घटना घडल्यानंतर संबंधित बस कराड बसस्थानकात लावण्यात आली. या घटनेनंतर दगडफेक करणाऱ्या अज्ञातांच्या विरोधात संबंधित बसचे चालक, वाहकांकडून रात्री उशीरापर्यंत कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.