सांगली प्रतिनिधी । शेतकर्यांनी पिकवण्यापेक्षा विकायला शिकलं पाहिजे असं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले. ते क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेच्यावतीने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आयोजित केलेल्या शिवार कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. शेट्टी म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकर्यांना जगात काय नव तंत्रज्ञान आले आहे. याची माहिती मिळाली तरच तो आधुनिक शेती पिकवू शकेल.
शिवार कृषी प्रदर्शन हे शेतकर्यांसाठी दिशादर्शक असेही ते यावेळी म्हणाले. शेतकर्यांच्या डोक्यातून जोपर्यंत जात धर्म,पक्ष, नेता जात नाही तोवर तुम्हाला कोण वाचवू शकत नाही. चळवळीला तुम्ही साथ देत नाही जरा लाजा वाटू द्या असा उद्विन्ग सवाल त्यांनी केला. शेतकर्यांनी दबावगट केला तरच तुमचे प्रश्न मिटतील व सुटतील शेतकर्यांना त्यांची बाजू घेणारे नेते तयार करावे लागतील हे वळू पोहोचणे बंद करा अन्यथा भविष्यात तुमचे कुत्र हाल खाणार नाही, असे शेट्टी म्हणाले.
कोल्हापूरचे कारखाने पंधरा दिवसांत एकरकमी रक्कम देतात तर सांगलीचे दोन महिने झाले तरी जमा करत नाहीत. नाव मोठे लक्षण खोट याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील नेते मोठे झालेत व कारखाने दरिद्री असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांचा ऊस न्यायचा पण पैसे द्यायचे नाहीत हे धंदे आता बंद करा. शेतकर्यांनी तक्रारी कराव्यात त्यांचं व्याजासह पैसे मिळवून मी देतो, असे सांगत दुसर्यासाठी शेती करायची बंद करा, असे आवाहन शेट्टी त्यांनी शेतकर्यांना केले.