अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण थांबवा; हिंदू एकता आंदोलनाचे राज्यपालांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी मा.विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली “राजभवन” महाबळेश्वर याठिकाणी भेट घेतली .हिंदू एकता आंदोलन यांच्यावतीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरी शेजारील अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करावी अशा सुचना महामहिम राज्यापाल यांनी महाराष्ट्र शासनाला कराव्यात अन्यथा हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्रभर आंदोलन करेल असे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या अफजल खान रुपी राक्षसाचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगड च्या पायथ्याशी कोथळा काढला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भिमरुपी भीम पराक्रमाची नोंद देशाच्या इतिहासात नोंदली गेली दुर्दैवाने आज त्याच प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न काही धर्मांधांकडून केला जात आहे अशा समाजविघातक प्रवृत्तींना पायबंद करण्यासाठी तसेच त्या ठिकाणी झालेले अतिक्रमण तात्काळ जमीनदोस्त करण्यात यावे अशा सूचना प्रशासनाला आपण कराव्यात व माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची आदेशाची अंमलबजावणी व्हावी असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी महामहिम राज्यपाल यांच्याकडे व्यक्त केले.

यावेळी हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष मा.विक्रमजी पावसकर, उप जिल्हाध्यक्ष श्री.रुपेश मुळे ,कार्याध्यक्ष हिंदू एकता श्री.राहुल याद व, हिंदू एकता शहराध्यक्ष श्री.प्रकाश जाधव, श्री.शानबाग (सर),करवडी उपसरपंच हिंदू एकता श्री.हिंदुराव पिसाळ ,पाटण तालुकाध्यक्ष हिंदू एकता श्री.गणेश पाटील, श्री.अजय पावसकर, श्री.सागर काळे, श्री.गणेश माने, श्री.महेश डांगे यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment