हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cab एग्रीगेटर्सच्या विरोधातील तक्रारी वाढतच आहे. ज्यामुळे आता त्यांची मनमानी रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने आता कॅब बुकिंग आणि बुकिंग रद्द करण्याबाबत नवीन सूचना जारी केल्या गेल्या आहेत. या अंतर्गत आता कोणत्याही कॅब चालकाने योग्य कारण न देता बुकिंग रद्द केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यासोबतच कॅश पद्धतीने भाडे घेण्यासही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
हे लक्षात घ्या कि, 10 मे 2022 रोजी Cab एग्रीगेटर्ससोबत झालेल्या बैठकीत सरकारकडून इशारा देण्यात आला होता. यावेळी सांगितले गेले होते कि, जर त्यांनी त्यांच्या सिस्टीम मध्ये सुधारणा केली नाही आणि ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेतली नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यानंतर 20 मे रोजी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) यासंबंधी Ola आणि Uber ला नोटीस बजावली. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी प्राधिकरणाने Ola आणि Uber ला 15 दिवसांची मुदत दिली गेली होती.
हे लक्षात घ्या कि, गेल्या काही दिवसांत Cab एग्रीगेटर्सविरुद्धच्या तक्रारींमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. यामधील ग्राहकांच्या बहुतेक तक्रारी या सेवांमधील कमतरता आणि इतर अनुचित व्यापार पद्धतींशी संबंधित आहेत. यामध्ये Cab चालकांकडून विनाकारण बुकिंग रद्द करणे ही सर्वात मोठी तक्रार आहे. याशिवाय ठराविक रकमेपेक्षा जास्त भाडे आकारणे, रोखीने भाडे मागणे, प्रवासादरम्यान वाहनामध्ये एसी न लावणे अशा तक्रारीही ग्राहकांकडून होत आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.olacabs.com/
हे पण वाचा :
Business Idea : LED बल्ब युनिट बसवून मिळवा लाखोंचा नफा !!!
Railway कडून 212 गाड्या रद्द !!! आपल्या गाडीचे स्टेट्स तपासा
इशारा !!! आता मोठ्या व्यवहारांवर Income Tax Department ठेवणार लक्ष, पकडताच बजावणार नोटीस
Investment : Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा बँकांच्या FD पेक्षा जास्त व्याज !!!
Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त !!! नवीन दर पहा