सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खटाव तालुक्यातील तब्बल 35 गावे हायरिस्कमध्ये असल्याने माण- खटावचे प्रातांधिकारी यांनी कडक लाॅकडाऊनचा आदेश दिला आहे. पंचायत समिती खटाव (वडूज) येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत 14 दिवसांचा आदेश देण्यात आलेला आहे.
सोमवारी दि. 7 जून रोजी प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती खटाव (वडूज) येथे तातडीची मिटींग झाली. त्यामध्ये तालुक्यातील 35 गावे हायरिक्समध्ये असल्याने त्यांना स्वतंत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुसेसावळी गावासह व तालुक्यातील 35 गावात 14 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. शासनाने दिलेले निर्देश संपूर्ण गावाला पाळणे बंधनकारक असणार आहे.
या कालावधीत गावातील सर्वांचे सर्वेक्षण करुन आरोग्य विभागामार्फत टेस्टींग करण्यात येणार आहे. तसेच गावाबाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी असणार आहे. आपले गावासाठी लॉकडाऊन कालावधी दि. 9 जून ते दि. 22 जूनपर्यंत असणार आहे. तरी सर्व सुजाण नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करुन आपले गाव कोरोनामुक्त करुया. प्रांताधिकारी खटाव-माण यांचे आदेशानुसार मंगळवार दुपारी 2 वाजलेपासून या नियमांची अंमलबजावणी सुरु होणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.