राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; वडेट्टीवारांनी दिले ‘हे’ संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सध्या राज्यात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधामुळे जास्त फरक पडताना दिसत नाही आहे त्यामुळे लवकर राज्यात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

लोकांकडून संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली जात आहे. या मागणीवर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येतील. कडक लाॅकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ दिवसांत निर्णय घेतील असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मदत पुर्नवसनाचे १६०० कोटी केंद्र सरकारकडून येणे अपेक्षित आहे पण अजूनपर्यंत ते आले नाही आहेत. पुढील काही दिवसांत ते येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या दिल्लीत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. महाराष्ट्रातसुद्धा लाॅकडाऊन नियमावलीत बदल करण्यात येतील.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे लॉकडाऊन करावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या दिल्लीत ६ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच लॉकडाऊन जाहीर करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment