मुंबई । मुंबईतील शाळेत वसूल केली जाणारी वाढीव फी आणि शाळेच्या मनमानी कारभाराबाबत विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज कृष्णकुंजवर जाऊ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शाळेकडून मनमानी कारभार सुरु असून कोरोना काळात शाळा फी कमी करायला सुद्धा नकार देत असल्याचे पालकांनी राज ठाकरे यांना सांगितलं. यावर आधी आपण सरकारशी हात जोडून बोलू नाहीतर मग हात सोडून बोलू, असं आश्वासन राज ठाकरे यांनी पालकांना दिलं आहे.
याशिवाय गेल्या दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. ती लवकरात लवकर सुरु व्हावी. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांनी फीवाढीचा मुद्दाही राज ठाकरे यांच्यासमोर पालकांनी मांडला. यावर राज ठाकरे यांनी तातडीने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना फोन करून याबाबत निर्णय घ्यावा, असं सांगितलं.
याबाबत लवकरच शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा सरकार काढत असून आपण पुन्हा एकदा वर्षा गायकवड यांच्याशी यासंदर्भात चर्चा करू, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे रखडलेले 11वी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरु व्हावी हीच अपेक्षा पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
भाजप अन राज्यपालांचे ठरलंय! राज्यपाल नियुक्त जागांसाठी सरकारची यादी नाकारली जाणार
वाचा सविस्तर-👉https://t.co/m6jGZmfDMQ@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @BSKoshyari @CMOMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 2, 2020
राज्यपाल नियुक्त जागेसाठी एकनाथ खडसेंचा पत्ता कट? 'हे' प्रकरण ठरणार कारणीभूत
वाचा सविस्तर- 👉 https://t.co/KvVnXfIixU@EknathGKhadse #HelloMaharashtra @BSKoshyari— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 2, 2020
कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in