Wednesday, October 5, 2022

Buy now

पुण्यातील विद्यार्थ्यांची कमाल ! तयार केली ड्रायव्हरलेस गाडी

पुणे : हॅलो महाराष्ट्र – वर्ल्ड क्लास ‘टेसला’ कारबद्दल आपण ऐकले आहे. या कारमध्ये ड्रायव्हर नसतो. हे आपल्याला माहितीच आहे. मात्र आता या गाडीला टक्कर देत पुण्यातील MIT कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरलेस गाडी तयार केली. यानंतर महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या धडाक्यानं या गाडीचं अनावरण करण्यात आले. MIT कॉलेजमधील यश केसकर, सुधांशु मणेरीकर, सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे आणि प्रेरणा कोळीपाका या विद्यार्थ्यांनी ही ड्रायव्हरलेस कार तयार केली आहे. अशा प्रकारचं वाहन प्रोजेक्टमधून सादर करण्याची विद्यार्थ्यांची ही पहिलीच वेळ होती.

या विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील प्रोजेक्टचा एक भाग म्हणून ही भन्नाट गाडी बनवली आहे. या ड्रायव्हरलेस गाडीचं गाडीचं प्रात्यक्षिक या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं आहे. माणसांच्या काही चुकांमुळे अनेक अपघात होत असतात आणि हेच दररोज होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यासाठी या गाडीचं डिझाईन करण्यात आले आहे अशी माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली आहे. हि गाडी तयार केल्यामुळे या विद्यार्थ्यांचं सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

या गाडीची वैशिष्ट्यं
या गाडीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अद्ययावत प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यास मदत होणार आहे. ही गाडी लेव्हल थ्री ऑटोनॉमीवर आधारित असून यात बीएलडीसी मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. या वाहनाला उर्जा देण्यासाठी लिथियम आयर्न बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी इलेक्ट्रिक आणि ऑटोमॅटिक असणार आहे.