खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाळांतील फी कपातीवरून सध्या भाजपकडून ठाकरे सरकारवर घणाघाती टीका होऊ लागली आहे. दरम्यान आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली. यानंतर आज राज्य सरकारच्यावतीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचे आदेश राज्य सरकारच्यावतीने देण्यतात आले असून त्याचा जीआरही काढण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चालू शैक्षणिक सन 2021- 22 या वर्षातील 15 टक्के फीमध्ये राजत सरकारकडून कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात एखाद्या विद्यार्थ्याने फी भरली नाही तर त्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नसल्याचेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले असून ज्यां विध्यार्थ्यानी यावर्षीची फी पूर्णपणे भरली आहे. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या फी मधील 15 टक्के फी पुढील फिमध्ये समाविष्ट करावी किंवा पालकांना ती परत करावी, असे आदेश देण्यात आलेले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्यावतीने महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी असे आदेश देण्यात आले होते. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते. कोर्टाच्या निर्णयानंतर खासगी शाळांच्या 15 टक्के फी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत निर्णय झाल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. मात्र, त्याची अंलबजावणी करण्यात आली नव्हती. त्याबाबत गुरुवारी सायंकाळी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून फी कपातीबाबत अधिकृत निर्णय घेत शासन निर्णय जारी करण्यात आला.

काल राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या खासगी शाळांच्या फी कपातीच्या बाबतीत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आज राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्यावतीने फी कपातीबाबत महत्वाचा अधिकृत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता खासगी शाळांकडून पालकांकडून घेतल्या जाणाऱ्या फीमध्ये 15 टक्के कपात केली जाणार आहे.

You might also like