सुभेदार विजय शिंदे यांच्यावर विसापूरला शासकीय इतमातात अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील विसापूर (ता. खटाव) येथील सुपुत्र सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचे पार्थिव आज पहाटे पुणे विमानतळावर दाखल झाले होते. तेथे लष्कर विभागाने विजय शिंदे यांना मानवंदना दिली. त्यानंतर पार्थिव मूळगाव विसापूर येथे आणण्यात आले. लोकांनी रस्त्याच्या दुर्तफा उभे राहून सुभेदार विजय शिंदे अमर रहे अशा घोषणा दिल्या. आज रविवारी दि. 29 रोजी हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी साश्रूनयनांनी विजय शिंदे यांना अखेरचा निरोप दिला.

लडाख प्रदेशात शुक्रवारी दि. 27 रोजी भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. विजय शिंदे यांना दोन 9 वर्षाच्या जुळ्या मुली आहेत. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ व मुली असा परिवार आहे. विजय यांचे वडिल तसेच भाऊ लष्करातच कार्यरत होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1170532573704651

 

शहीद जवान विजय शिंदे ‘अमर रहे अमर रहे’ वीर जवान विजय शिंदे अमर रहे च्या जयघोषाने खटावकरांनी शाश्रु नयनांनी वीर जवानाला आदरांजली दिली. फुलांनी सजवलेल्या टेम्पोतून त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी विसापूरला आणण्यात आले. आज रविवारी दि. 29 मे रोजी विसापूर येथे दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सुभेदार विजय शिंदे यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. गावात श्रध्दाजंलीचे मोठ- मोठे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते.

 

Leave a Comment