औरंगाबाद | सोमवारी नाथसागर धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेला तरूण पाण्यात बुडाल्याची घटना दुपारी घडली होती. या तरुणाचा शोध घेण्यासाठी पैठण येथील पोलिसांनी औरंगाबाद येथील अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावले आणि जवनांनी मंगळवारी दुपारी तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
आदेश रमेश शिरसाट (25 अहमदनगर) असे या मृत युवकाचे नाव असून पैठण तालुक्यातील इसरवाडी येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नकार्यासाठी आला होता. तो पैठण येथील नाथसागर धरणामध्ये पोहण्यासाठी सोमवारी गेला असता पाण्यात बुडाला होता. त्यामुळे पैठण पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक छोटूसिंग गिरासे यांनी औरंगाबाद येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. मंगळवारी दुपारी अग्निशमन दलाचे प्रमुख आर. के.सुरे ,मोहन मुंगूसे, अब्दुल अजीज, हरिभाऊ घुगे, मोहम्मद मुजफ्फर, शेख इसकास ,दिनेश मुगसे , शशिकांत गिते, संग्राम मोरे, अशोक पोटे, यांनी धरण्याचा पाण्यात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला.
मृत आदेश हा धरण पाहण्यासाठी गेला असता, त्याला पोहोण्याचा मोह आवरला नाही. पोहण्याची इच्छा झाल्याने त्याने साखळी क्रमांक 114 जवळ पाण्यात उडी घेतली होती. त्या ठिकाणी जोरदार वारे असल्यामुळे पाण्याच्या लाटा उसळत होत्या त्यामुळे आदर्शला पाण्याचा अंदाज आला नाही म्हणुन तो धरणात बुडाला होता. मृतदेह 24 तासानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.