‘या’ देशात लस घेतल्यानंतर तरुणांमध्ये समस्या वाढत आहेत, 300 लोकांच्या हृदयाला सूज आली आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । अमेरिकेत सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने नुकतीच ज्यांना लस (fully vaccinated) चे सर्व डोस मिळालेले आहेत अशा लोकांना मास्क न घालण्याची परवानगी दिली. तेथे fully vaccinated अशा लोकांना मानले जाते ज्यांनी डबल डोस असलेल्या लसीचे दोन डोसआणि सिंगल डोस असलेल्या लसीचे एक डोस घेतल्यानंतर दोन आठवडे उलटून गेले आहेत. मात्र, आता अमेरिकेला एक नवीन समस्या भेडसावत आहे. वास्तविक, CDC ला लसीकरण केलेल्या तरुणांमध्ये इतर काही लक्षणे दिसू लागली आहेत. लस दिल्यानंतर बरेच तरुण हृदयात सूज आणि जळजळ होत असल्याची तक्रार करत आहेत.

CDC चे संचालक रोशेल वॅलेन्स्की यांनी व्हाईट हाऊसच्या ब्रीफिंगला सांगितले की,” लसीकरणानंतर 300 हून अधिक तरुणांमध्ये छातीत जळजळ झाल्याचे वृत्त आले आहे. समितीला लस घेतल्यानंतर मायोकार्डिटिस म्हणजे हृदय कमकुवत होण्याच्या वाढत्या प्रकरणांबद्दलही काळजी वाटते आहे.” CDC ने मेच्या अखेरीस कोविड लसीनंतर मायोकार्डायटीसच्या काही घटनांवर लक्ष ठेवले. या अहवालानुसार महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयाशी संबंधित अधिक आजार आढळून येत आहेत.

तथापि, समितीने आपल्या COVID-19 लसीकरण मोहिमेतील कोणतेही बदल फेटाळून लावले आहेत. समितीचे म्हणणे आहे की,”ही लस आणि हार्ट इन्फ्लेमेशन यांच्यातील संबंध लक्षात घेऊन लवकरच यावर चर्चा केली जाईल.”

CDC ने म्हटले आहे की, अमेरिकेत लसची संपूर्ण मात्रा घेतल्यानंतरही कोरोना संसर्गाची फारच कमी प्रकरणे नोंदली गेली आहेत. याला ब्रेकथ्रू केसेस (breakthrough cases) असे म्हणतात. CDC च्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत 26 एप्रिलपर्यंत 9.5 कोटी लोकांना कोरोना लसीचे सर्व डोस देण्यात आले होते, त्यापैकी केवळ 9,045 लोकांना लसीकरणानंतर कोरोना झाला.

अमेरिकेत प्रामुख्याने फायझर-बायोटेक आणि मॉडर्नाची mRNA लस दिली जात आहे. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन भारतात देण्यात येत आहेत. अलीकडेच रशियाची स्पुतनिक-V लसदेखील भारतात देणे सुरू झाले आहे. कोविशील्ड एक व्हायरल वेक्टर लस आहे तर कोव्हॅक्सिन इनएक्टिवेटेड व्हायरस लस आहे. बरेच तज्ञ mRNA लस ही व्हायरसच्या नवीन व्हेरिएंट्सवर अधिक प्रभावी असल्याचे मानतात.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment