हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Success Story : आपल्या जगात अशीही काही लोकं आहेत ज्यांनी वाईट परिस्थितीतही हार न मानता अथक परिश्रम करून यश मिळवले आहे. बिहारच्या दिलखुश कुमारची गिष्ट देखील अशीच काहीशी आहे. एका छोट्या गावात राहणार हा युवक रिक्षाचालक आणि भाजीविक्रेता देखील होता. मात्र, आता तो रॉडबेझ या करोडो रुपयांच्या कंपनीचा संस्थापक आणि सीईओ बनला आहे.
बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील बनगाव इथला दिलखुश आहे. त्याने नुकतेच 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. बिहारमध्ये टॅक्सी सर्व्हिस उपलब्ध करून द्यायची होती. त्यासाठी दिलखुशने रॉडबेझ सुरू केले. हे स्टार्टअप इतर टॅक्सी सर्व्हिस प्रोव्हायडर्स (उबेर किंवा ओला) सारखे नाही. मुळात ही एक डेटाबेस कंपनी आहे जी ग्राहकांना टॅक्सी चालकांशी जोडून 50 किमी पेक्षा जास्त अंतराच्या बाहेरच्या प्रवासासाठी वाहने पुरवते. Success Story
याबाबत बोलताना दिलखुश सांगतो की, IIT गुवाहाटी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून पदवी घेतलेल्यांना आता त्याने रॉडबेझमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. त्यांनीही त्याच्या या उपक्रमाला योग्यपणे पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे IIM मधील काही विद्यार्थीही पार्ट टाइम बेसिसवर या स्टार्टअपमध्ये सामील झाले आहेत. Success Story
आपल्या जुन्या दिवसांची आठवणीने भावूक दिलखुश थोडा म्हणाला की,” दिल्लीत रिक्षा चालवायचा. पाटण्यातही तो रस्त्यावर भाजी विकायचा. तसेच जेव्हा तो गार्डच्या नोकरी मिळवण्यासाठी मुलाखती द्यायला गेला तेव्हा त्याला अशिक्षित आणि अडाणी मानले गेले. यावेळी त्याला iPhone चा लोगो देखील ओळखण्यास सांगितले गेले, जे तो ओळखू शकला नाही. कारण तो फिलायनदाच आयफोन पाहत होता. मात्र, त्याने कधीही हार मानली नाही. दिलखुशने आपल्या वडिलांकडून गाडी चालवायला शिकली. पैशांअभावी त्याला बारावीपर्यंतच शिक्षण घेता आले. त्यानंतर पैसे कमावण्यासाठी त्याने गाडी चालवायला सुरुवात केली. Success Story
हे लक्षात घ्या कि, रॉडबेझची सुरुवात करताना दिलखुशने सेकंड-हँड टाटा नॅनो घेतली होती. मात्र हा स्टार्टअप सुरू केल्यानंतर 6-7 महिन्यांतच त्याने आणि त्यांच्या टीमने 4 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात यश मिळवले आहे. पहिल्या टप्प्यात या कंपनीकडून पाटणा ते बिहारमधील प्रत्येक गावात सर्व्हिस दिली जाते आहे. आता लवकरच दुसऱ्या टप्प्यात त्यामध्ये शहरे देखील जोडली जाणार आहेत. तसेच भविष्यात बिहारमधील प्रत्येक गाव आपल्या टॅक्सी सर्व्हिसने जोडण्याचे ध्येय त्याने ठ्वले आहे. Success Story
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rodbez.in/
हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…