कंबरदुखीने त्रस्त आहात? पहा कारणे आणि घरगुती उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडच्या काळात पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास बहुतेक जणांना असतोच. पाठीच्या खालच्या बाजुला म्हणजेच कंबरेत होणाऱ्या वेदना म्हणजे कंबरदुखी. बदललेल जीवनमान, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, शरीरात असलेली कॅल्शिअमची कमतरता, अशा अनेक कारणांनी स्त्रिया आणि पुरुषांनाही कंबरदुखीचा त्रास उद्भवतो.

कंबरदुखीची मुख्य कारणे-

चुकीच्या पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे कंबरदुखीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

आपल्या आहारात पोषक घटकांची कमतरता असेल तरीही पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास जाणवू लागतो.

सध्याच्या काळात मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर वाढलेला आहे, सतत कम्प्युटर वर बसल्याने सर्वप्रथम मानेला प्रॉब्लेम होतो आणि त्यानंतर पाठ आणि कंबरेला वेदना होण्यास सुरुवात होते.

कधी कधी आपण एकाच जागी खूप वेळ बसतो त्यामुळेही आपलं शरीर अवघडत आणि पाठ आणि कंबरेला याचा मोठा फटका बसतो. शक्यतो प्रवास करताना ही समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.

कंबरदुखीवर काय कराल उपाय-

चालताना किंवा बसताना आपली पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे कंबरदुखीचा त्रास होणार नाही.

शक्यतो एका जागी जास्त वेळ बसू नका, जर तुम्ही ऑफिस मध्ये काम करत असाल तर अधून मधून चालण्याचा प्रयत्न करा.

कॅल्शिअम युक्त आहार घ्या. तुमची कंबरदुखी दूर करण्यात कॅल्शियम महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. त्यामुळे शक्य तितका कॅल्शियम युक्त आहार घ्यावा. ते शक्य नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लीमेंट्स घेतली तरी चालेल.

नारळाच्या तेलात लसणाच्या काही पाकळ्या टाकून ते तेल गरम करून घ्या आणि जिथे दुखत आहे त्या कंबरेच्या भागाला लावा.