हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हवामानातील बदल किंवा खाद्यपदार्थामधील बदल यामुळे हल्ली कोरड्या खोकल्याचे प्रमाण वाढलेले आहे. कोरड्या खोकल्याकडे जर दुर्लक्ष केलं आणि योग्य वेळेत यावर उपाय न केल्यास प्रकृती गंभीर देखील होऊ शकते. आज आपण जाणून घेऊया यावरील रामबाण घरगुती उपाय…
आले आणि मीठ-
खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून नेहमीच आले हि फर्स्ट चॉईस मानली आहे. आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या. त्यानंतर थोड्या वेळाने आले बाहेर फेकून कोमट पाण्याने गुळण्या करा, यामुळे तुमचा खोकला जाण्यास मदत होईल.
मध-
मध अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या. नियमित हा उपाय केल्यास कोरड्या खोकल्यापासून तुमची सुटका होईल.
मीठ पाणी-
सकाळी व संध्याकाळी पाण्यात सैंधव मीठ घालून पाणी त्या कोमट पाण्याने गुळण्या करा. यामुळे घाश्यातील जळजळ आणि संक्रमण निघून जाईल. याशिवाय मिठाच्या पाण्याने फुफ्फुसात जमा होणारा कफ कमी होते. यासाठी, एक कप कोमट पाण्यात पाव चमचा मीठ मिसळा. दिवसातून बर्याच वेळा गुळण्या केल्या तरी चालेल.
हळद- दूध
सर्वसामान्य पणे खोकला झाल्यास गरम गरम दुधात हळद टाकून त्याचे सेवन करतात. हळदीचे दूध प्यायल्याने केवळ खोकलाच नाही तर अनके आजारांपासून तुमची सुटका होऊ शकते. हळदीमुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो.