हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक असून एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यातील बळीराजाला कसे सुखी करता येईल यासाठी त्याच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. याशिवाय दोन साखर कारखान्यांमध्ये असणारे हवाई अंतर याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला. दोन साखर कारखान्यांमध्ये असणाऱ्या हवाई अंतराविषयी सकारात्मक निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले. pic.twitter.com/0I8BvcCR90
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 29, 2022
याशिवाय ऊस तोडणी आणि वाहतुकीसंदर्भात साखर कारखान्यांचे लेखा परीक्षण करण्यात यावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. शेतीला वीज पुरवठ्यासाठी सगळे कृषी फिडर सौरऊर्जेवर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.