व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Satara News : पठ्ठ्यानं कलिंगडमधून 60 दिवसांत कमवले 3 लाख

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
अतिशय दुर्गम भागातील तरूणांकडून शेतीत अनेक पिके व त्यावर प्रयोग करून त्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले जात आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील राहुडे गावातील शेतकरी सुहास माने याने 3.5 एकरात कलिंगडाचे अत्यंत दर्जेदार उत्पादन घेतले असून 60 दिवसात 3 लाख रुपये कमवले आहे.

पाटण तालुक्यातील राहुडे या गावात असलेले माजी सरपंच सुहास माने यांनी शेतीमध्ये कलिंगड लागवड करण्यात निर्णय घेतला. त्यांनी अत्यंत प्रतिकूल वातावरणात कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून सुहास माने यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचीही तसेच फळपिकांची चांगली माहिती असल्याने त्यांनी 5 फेब्रुवारी 2023 रोजी आरोही ,सरस्वती व मेलोडी या जातीच्या कलिंगडाची लागवड केली.

हॅलो कृषी हे मोबाईल अँप डाउनलोड करा आणि तुमच्या आसपास असलेल्या रोपवाटिका मालकांशी थेट आणि अगदी कमी वेळेत संपर्क साधा. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड आणि Install करा. Hello Krushi ओपन करताच तुम्हाला त्यामध्ये रोपवाटिका, खत दुकाने आणि कृषी केंद्र हा पर्याय दिसेल. यावर क्लीक करताच तुम्हाला तुमच्या आसपास असलेल्या खत दुकानदार आणि रोपवाटिकांची यादी आणि त्यांचे मोबाईल क्रमांक दिसतील. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही पिकवलेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकू सुद्धा शकता. यासोबत आपल्याला शेतीतील इतर व्यवसायासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या योजनांची माहिती आदी गोष्टीही Hello Krushi अँपवर पाहता येतात.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click here…

काय आहेत कलिंगडाची वैशिष्ट्ये

एकूण साडेतीन एकरात त्यांनी ही लागवड केली आहे. त्यांनी लागवड केलेले कलिंगड वरून काळे दिसणारे असून आत मात्र पिवळे रंगाचे आहे. खाण्यासाठी खुसखुशीत गोड व रसाळ असलेले हे कलिंगड आहे.

मानेंच्या कलिंगडाची कंपनीकडून जागेवर जाऊन खरेदी

पाटण तालुक्यातील राहुडे येथील शेतकरी सुहास माने यांनी साडेतीन एकरांमध्ये कलिंगडाचे भरघोस उत्पादन काढले आहे. त्यांच्या कलिंगडाची माहिती पंचक्रोशीत पसरली. याची माहिती रिलायन्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर आली. त्यांनी वेळ न लावता थेट सुहास माने यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या कलिंगडाबाबत माहिती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी माने यांच्या कलिंगडाच्या फ्लॉटला भेट दिली. कलिंगडाची पूर्ण तपासणी केल्यानंतर त्यांनी 27 रुपये किलोप्रमाणे माने यांच्या सर्व कलिंगडाची खरेदी देखील केलेली आहे.

kalingad

कलिंगड लागवडीसाठी आला ‘इतका’ खर्च

पाटण सारख्या दुर्गम भागात एखादा शेतकरी अनेक प्रयोग करून त्यातून भरघोस उत्पादन काढेल यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, अशा दुर्गम भागात माजी सरपंच, शेतकरी सुहास माने यांनी कलिंगड लागवड केली. त्यांना यासाठी एकरी 70 हजार रुपये इतका खर्च आला. यामधून 60 दिवसात एकूण उत्पन्न एकरी तीन लाख रुपये इतके त्यांना मिळाले आहे. पाच ते सहा लाखांचा निव्वळ नफा त्यांनी कलिंगड लागवडीतून मिळवला आहे.

suhas mane

स्थानिक नेत्यांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कौतुक

राहुडे येथील शेतकरी सुहास माने यांनी उत्पादित केलेल्या अत्यंत दर्जेदार अशा कलिंगडाच्या प्लॉटला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकतीच भेट दिली. तसेच त्यांच्या कलिंगडाची माहिती घेतली. शिवाय त्यांचे अभिनंदनही केले. सुहास माने यांच्या कलिंगडाची चर्चा जिल्हाभर पसरली असल्याने आता जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांकडून माने यांच्या कलिंगडाच्या प्लांटला भेटी दिल्या जात आहेत. तसेच त्यांच्याकडून कलिंगड लागवडीची माहिती घेतली जात आहे.