जखिणवाडी येथे यात्रेत कोयत्याने जीवघेणा हल्ला

0
158
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | गावच्या यात्रेदरम्यान एकावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केला असून रात्री उशिरा एकाला अटक केली आहे. जखिणवाडी (ता. कराड) येथे बुधवार, दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गावच्या कमानीजवळ मारामारी झाली. संजय शंकर पाटील असे जखमीचे नाव आहे. अविनाश शेडगे, देवेंद्र येडगे व पृथ्वीराज येडगे (सर्व रा. जखिणवाडी, ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत. देवेंद्र अशोक येडगे याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, जखिणवाडी येथील कमानीजवळ संजय पाटील उभा असताना समोरून आलेल्या अविनाश शेडगे, देवेंद्र येडगे व पृथ्वीराज येडगे या तिघांनी पहाटे व सायंकाळी पुतण्या रुपेश पाटील यांच्यात झालेल्या भांडणाच्या कारणावरून मनात राग धरून दमदाटी करत मारहाण केली. यावेळी संशयितांनी कोयत्याने संजय पाटील याच्यावर वार केले.

[better-ads type=’banner’ banner=’196069′ ]

दरम्यान, गावच्या यात्रेवेळी जखिणवाडी येथे कोयत्याने वार झाल्याची माहिती समजताच डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत संशयित पसार झाले होते. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here