मंत्रालयात दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच मंत्रालयात एका व्यक्तीने सातव्या मजल्यावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ सदर व्यक्तीला खाली उतरवल्यामुळे दुर्घटना टळली. एवढा मोठा बंदोबस्त असतानाही हा व्यक्ती सातव्या मजल्यावर कसा गेला असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार याची भाष्य करत काय सगळीकडे चढाचढीच चालली आहे, याची माहिती घेण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर बोलताना होय, २-३ लोक मंत्रालयावर चढली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काही मागणी त्यांनी केली होती. मात्र आता त्यांना खाली आणलं आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, आजच सकाळी सातारा जिल्ह्यातील सुभाष भानुदास या शेतकऱ्याने विधानभवनाच्या बाहेर स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. शेतीच्या वादातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर आता मंत्रालयात दुसऱ्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.