सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
“देव तारी त्याला कोन मारी” याचा प्रत्यय सातार्यातील फलटण तालुक्यात आलाय..घरगुती भांडणातुन झालेल्या वादामुळे विहिरीत जीव देण्यासाठी गेलेली महिला विहिरीच्या अडगळीत अडकली. मात्र या महिलेने आरडाओरडा केल्यावर विहिरीतुन तिला सुखरुप काढण्यात यश आलंय.
फलटण तालुक्यातील एका गावात घरगुती वादातुन झालेल्या भांडणात महिलेने गावाजवळच्या एका विहिरीत उडी मारली मात्र “देवतारी त्याला कोन मारी” याचा प्रत्यय याठिकाणी घडला हि महिला विहिरीत एका अडगळीत अडकल्याने जीव देण्याच्या उद्देशाने आलेल्या महिलेचा थोड्या वेळातच विचार बदलला आणि सुरु झाली जीव वाचविण्यासाठी महिलेची धडपड पाच तासाहुन अधिक हि महिला विहिरीतील अडगळीतील कपारीला धरुन होती. यावेळी विहिरी शेजारी गावातील अक्षय मोहिते हे त्यांच्या शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांना शेतालगत कोणीतरी अनोळखी व्यक्ती शोधाशोध करत असल्याचे निदर्शनास आले.त्यांची विचारपुस केली असता संबंधित व्यक्तीने घरगुती वादातुन एक विवाहिता घरातून रागातून निघून गेल्याने तिचा शोध सुरु असल्याचे सांगितले.महिला त्या ठिकाणी नसल्याने संबंधित व्यक्ती त्या ठिकाणाहुन निघून गेली. मात्र गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अक्षय मोहिते हे विहिरीची पाण्याची मोटर सुरु करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विहिरीतून महिलेचा ओरडण्याचा आवाज आला.
त्यांनी विहिरीवरुन वाकून पाहिले असता एक महिला विहरीच्या कठड्याने धरुन मदतीसाठी आकांत करत असल्याचे त्यांना दिसले. विहिर अडगळीची होती. त्याला पायर्याही नव्हत्या. मोहिते यांनी पोलिस पाटील दयानंद चव्हाण यांना फोन करुन माहिती दिली विवाहितेला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शिताफिचे प्रयत्न सुरु झाले. अखेर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्या विवाहितेला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर ती बेशुध्द पडली.तात्काळ त्या विवाहितेला उपचारासाठी फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.यावेळी घरगुती वादाला कंटाळुन हे कृत्य केल्याचे या महिलेने सांगितलय
सध्या या प्रकरणाचा फलटण पोलिस तपास करीत आहेत…मात्र 100 फूट अडगळीच्या या विहिरीत लाकूड, लोखंडी पाईप असुन देखील एखादा वरुन पडल्यानंतर त्यातून जगू शकणार नाही अशीच परिस्थिती त्याठिकाणी आहे. मात्र १००फुट खोल पाणी असतानाही पाच तास तग धरुन हि महिला आपला जीव मुठीत धरुन बसली याचाच अर्थ देवतारी त्याला कोन मारी असा होतो.