महाबळेश्वरमध्ये युवकाची गळफास घेवून आत्महत्या, कारण अस्पष्ट

Mahableshwer Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या कासरूड गावातील धनेश अशोक चव्हाण (वय- 27) या युवकाने राहत्या घरात लोखंडी ॲंगलला नायलाॅन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. महाबळेश्वरपासून 40 कि.मी अंतरावर हातलोट गावाजवळ कासरूड हे गाव आहे.

या गावातील धनेश अशोक चव्हाण या युवकाने 8 सप्टेंबरच्या रात्री नायलाॅन दोरीच्या मदतीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याच गावात राहणारा अमित अशोक मोरे यांनी ही खबर 9 सप्टेंबर रोजी शिरवलीचे पोलिस पाटील विलास धोडींराम मालुसरे यांना दिली. पोलिस पाटील मालुसरे यांनी ही खबर कुंभरोशी औटपोस्ट पोलिस ठाण्याचे ए. एस. आय पावरा यांना दिली. पावरा यांनी 10 सप्टेंबर रोजी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात ही नोंद केली आहे.

दरम्यान, या युवकाने आत्महत्या का केली, युवकाच्या घरी कोण होते, त्याचे लग्न झाले होते की नाही, युवकाला इतर कोणी नातेवाईक आहेत का नाही, युवकाचा व्यवसाय काय होता या बाबत महाबळेश्वर पोलिसांनी काही माहिती दिली नाही. तपास केल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळणार आहेत. या घटनेचा पुढील तपास कुंभरोशीचे पावरा हे करीत आहेत.