आत्महत्या प्रकरण : कराड पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक, अन्य साथीदारांचा शोध सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कराड तालुका पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील सहा पैकी दोघांना रात्री उशिरा अटक केली. ओंकार दिलीप खबाले-पाटील (वय- 22) व रोहन मोहन घोरपडे (वय- 23, दोघेही रा. विंग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आगाशिवनगर येथील मंगेश कडव या युवकाचा मृतदेह वारणा नदीत आढळला होता. तत्पुर्वी 2 सप्टेंबर रोजी मंगेशला विंग येथील ओंकार खबाले यांच्यासह चार मित्र व बहिणीने मारहाण केली होती. त्यानंतर मंगेश बेपत्ता होता. तीन दिवस शोध घेऊन त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. शोध सुरू असतानाच सांगली जिल्ह्यातील कणेगावच्या हद्दीतील वारणा नदीत मंगेशचा मुतदेह सापडल्याने खळबळ उडाली.

मंगेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल ओंकारसह सहा जणांवर कराड तालुका पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी काल रात्री उशिरा सहायक पोलीस निरीक्षक रेखा दुधभाते यांच्यासह पोलीस पथकाने छापा टाकून संशयीत ओंकारला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला शनिवपर्यंत 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तर दुसरा संशयित रोहनला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सहायक निरीक्षक रेखा दुधभाते तपास करीत आहेत

Leave a Comment