सांगली येथील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

Sangli Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहात एका गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या दीपक आवळे या आरोपीने बुधवारी रात्री बाथरूममधल्या ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

काय आहे प्रकरण
दीपक आवळे याला ६ महिन्यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर त्याने तुरुंगातील बाथरूममध्ये टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर त्याला तातडीने सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण त्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला होता.

दिपकने काही दिवसांपूर्वी आपल्या परिवाराला आणि मित्रांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात कोणीही गुन्हा करू नका, तुरुंगातील दिवस वाईट असतात. बाहेर आल्यानंतर सुधारायची इच्छा असून त्यासाठी काही दिवस सांगलीबाहेरही जाणार असल्याचं त्याने म्हंटले होते. त्यानंतरसुद्धा दिपकने आत्महत्या का केली याचे कारण अजूनही समजू शकलेले नाही.