सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,
मिरज येथील गुरूवार पेठ येथे राहणाऱ्या पुष्पा अग्रवाल यांनी कृष्णा नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली तर त्यांचा मुलगा सुनिल सुरेश अग्रवाल यांनी रेल्वेखाली स्वत:ला झोकून देवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुष्पा अग्रवाल यांच्या आत्महत्येची मिरज शहर पोलिसात तर सुनिल अग्रवाल यांच्या आत्महत्येची मिरज रेल्वे पोलिसात नोंद झाली आहे.
गुरूवार पेठ येथे पुष्पा अग्रवाल या आपला वकील मुलगा सुनिल अग्रवाल सोबत राहत होत्या. मुलाच्या विवाहासाठी त्यांची खटपट सुरू होती. मुलाचा विवाह जमत नसल्यामुळे पुष्पा अग्रवाल याही अतिशय नाराज होत्या. त्यांचीही मनस्थिती चांगली नव्हती. तर सुनिल अग्रवाल हा मिरज कोर्टामध्ये काम करीत होता. अनेक वर्षापासून त्याचा वकीली व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायही करीत होते. सुनिल अग्रवाल यांचा विवाह जमत नसल्याने तेही कायम नाराज व कायम द्विधामनस्थित असायचे. आई व मुलाची दोन दिवसांपासून मन:स्थिती बिघडलेली होती. दोघेही कायम नाराज होते. दरम्यान मिरज कृष्णाघाट येथील स्मशानभूमी जवळ वकीलांंचा लोगो असलेली गाडी व लेडीच चप्पल तेथे पडलेले होते. कृष्णाघाट येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते सुनिल मोरे यांनी बेवारस गाडी व चप्पल याबाबतची माहिती मिरज शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली. गाडीबाबत माहिती काढली असता ही गाडी सोहेल सय्यद यांच्या नावावर असून ती गाडी सुनिल अग्रवाल यांना दिल्याचे समजले. गाडी दोन दिवस कृष्णाघाट येथे असल्याने अग्रवाल यांच्या नातेवाईकांनी पुष्पा अग्रवाल यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. आज कृष्णानदीपात्रात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. पोलिसांनी गाडीच्या अनुषंगाने अग्रवाल यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईकांनी हा मृतदेह पुष्पा अग्रवाल यांचा असल्याचे सांगितले. त्यानंतर अग्रवाल यांचे नातेवाईक सुनिल अग्रवाल यांचा शोध घेवू लागले. शोध घेत मिरज कृष्णाघाटपासून ते बेळगाव रेल्वेगेटजवळ आले. नातेवाईकांनी सुनिल अग्रवाल यांचे वर्णन गेटमनला सांगितले.
गेटमनने काल सायंकाळी रेल्वेखाली सापडून एक मयत झाला आहे असे सांगितले. लगेच अॅड.सुनिल अग्रवाल यांचे नातेवाईकांनी रेल्वे पोलिसात संपर्क साधला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह मिरज शासकीय रूग्णालयात असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी शासकीय रूग्णालयात जावून मृतदेह पाहिला असता. सुनिल अग्रवाल याचाच मृतदेह असल्याची खात्री पटली. मृतदेहाच्या चेहरा चांगला असल्याने त्यावरून अॅड. सुनिल अग्रवाल यांचा मृतदेह नातेवाईकांनी ओळखला.