संगमनेर प्रतिनिधी | अहमदनगरचे नवनिर्वाचित भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निवडीबद्दल लावण्यात आलेले बॅनर फाडल्याने संगमनेर मध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे बॅनर नेमके कुणी फाडले या बाबत कोणालाच माहिती नाही. मात्र संगमनेर पोलीस या प्रकाराचा कसून तपास करत आहेत.
सुजय विखे पाटलांचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याने संगमनेरमध्ये तणावपूर्ण शांतात असून अज्ञाताच्या विरोधात संगमनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणामागे नेमके कोण आहे. याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे टाकले आहे.
त्रास सहन करायला आपण राधाकृष्ण विखे पाटील नाही. मला निवडणुकीच्या काळात ज्यांनी त्रास दिला आहे. त्यांचा आपण आगामी काळात हिशोब चुकता करणार आहे असे म्हणून सुजय विखे पाटील यांनी विजयाच्या सभे पासूनच नव्या संघर्षांची राळ उडवून दिली होती. कदाचित त्याचा बदला म्हणून त्यांच्या विरोधकांनी हा प्रकार केला असावा असे बोलले जाते आहे. तर संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील घराण्याचा संघर्ष फार जुना आहे. त्याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे का हे देखील तपासून पहिले जाते आहे.
महत्वाच्या बातम्या
पृथ्वीराज चव्हाण होणार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
लठ्ठपणावरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
परशाची आर्ची १२ वीला झाली पास ; मिळाले एवढे टक्के गुण
विधान परिषद पोटनिवडणूक : या नेत्याला भाजपने दिली उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा