अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेल्या सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची खासदारकी धोक्यात आली आहे. येत्या २२ तारखे पर्यंत त्यांनी आपल्या निवडणूक खर्चाचे हिशोब नदिल्यास त्यांची खासदारकी जाणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस काढली असून त्यांना निवडणूक खर्चाचे हिशोब सादर करण्यासाठी कडक शब्दात सुनावले आहे.
लोकसभा अध्यक्षांची मोदींना वाटते भीती
सुजय विखे त्यांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा पराभव करून लोकसभा निवडणूक जिंकली. अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडली जात नाही हे पाहून सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला राम राम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपची उमेदवारी मिळवली. तसेच लोकसभा निवडणूक देखील जिंकली. मात्र आता त्यांना हलगर्जीपणामुळे खासदारकीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
म्हणून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ५ हजार पत्र
सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. या आधी त्यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा शिर्डी राखीव मतदारसंघातून खासदारकी जिंकली होती. त्यानंतर आता ते २०१९ मध्ये देखील लोकसभेवर निवडून गेले आहेत. मात्र खर्चाचे हिशोब नदिल्याने त्यांना देखील आपली खासदारकी सोडावी लागू शकते.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी मोफत मिळवण्याकरता आजच आमचा Whatsapp Group जॉईन करा
लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९ जाहीर
नवनिर्वाचित अध्यक्षांना लोकसभेत जाऊन आठवलेंनी दिल्या ‘आशा’ शुभेच्छा कि मोदींनाही नाही अवरले हसू